आरोग्य विभाग , जळगाव
*मा. मुख्य कार्यकारी अधिकारी* श्रीमती मीनल करणवाल मॅडम* यांचे महत्वकांक्षी कार्यक्रम *सुपोषित जळगाव* अंतर्गत
*जिल्हा आरोग्य अधिकारी मा. श्री सचिन भायेकर सर* तसेच रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल भंगाळे सर
प्राथमिक आरोग्य केंद्र चिनावल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ दिपल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तक गाव चिनावल येथे सुपोषित जळगाव अभियानांतर्गत अंगणवाडी- जिल्हा परिषद शाळा परिसर, चिनावल येथे प्रथिने युक्त आहार पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली. डॉक्टर दिपल यांनी आहारात प्रथीनांचे महत्व,पाकीट बंद पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले तसेच सुपोषित भारत कार्यक्रम भूमिका- कुपोषण कमी करणे, संतुलित आहाराची सवय लावणे व आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करणे याबद्दल समजावून सांगितले. यावेळी आरोग्य सहाय्यक सोनवणे आरोग्य सेवक सुभाष ठाकूर शताई अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.