भंडारा: जांब येथे वीज पडून दोन बैलांचा जागीच मृत्यू....
भंडारा जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसादरम्यान भंडारा जिल्ह्यातील जांब येथील रहिवाशी सौरभ सुभाष बोरकर यांच्या बैलजोडीवर विज पडून दोन बैल जागीच मृत्यू झाला. ही घटना दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान घडली. त्यानंतर घटनेच्या पंचनामा व पुढील कारवाई करण्यात आली असून दोन बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. ...