खुलताबाद: श्री घृष्णेश्वराचे दर्शन गाभाऱ्याबाहेरूनच, प्रचंड गर्दी उसळल्याने निर्णय, व्हीआयपी प्रोटोकॉलही बंद
आज दि २८ डिसेंबर रोजी सांयकाळी ५ वाजता नाताळ व नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.गर्दी नियंत्रणासाठी शनिवारी दुपारपासून गाभाऱ्यात जाऊन थेट शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची परंपरा तात्पुरती बंद करण्यात आली.आता गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरच ज्योतिर्लिंगाची मूर्ती ठेवून भाविकांना बाहेरून दर्शन दिले जात आहे.