कोंढाळी येथील महामार्गावर एका बिबट्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा बिबट्या साधारण एक वर्ष वयाचा नर शावक असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढाळी मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला एका बिबट्याचा मृतदेह दिसून आला. याची माहिती तातडीने पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली. हा मृत्यू एखाद्या अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झाला असावा की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास सध्या पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी करत आहेत.