साकोली तालुक्यातील एकोडी येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे 2020 मध्ये म्हणजे 25 वर्षापूर्वी इयत्ता दहावीत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवार दि13 जानेवारीला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळात पंचवीस वर्षांपूर्वी शिकविलेल्या शिक्षकांना आमंत्रित करून स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले.जुन्या आठवणींना उजाळा देत इतिहासात रमत स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करून या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान केला. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी हा क्षण आनंदाचा आणि भावनिकतेचा होऊन गेला होता.