जालना: काळ्या काचा लावलेल्या वाहनांवर कडक कारवाई; तालुका पोलीसानी 11 वाहनावर ठोठावला 14 हजार 500 रुपये दंड
Jalna, Jalna | Dec 22, 2025 जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, काळ्या काचा लावून फिरणार्या वाहनांवर विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. गुन्हेगारांकडून अशा वाहनांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाभरात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. सोमवार, दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, या आदेशांच्या अनुषंगाने तालुका जालना पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई केली.