वरणगाव नगरपरिषदेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज दिनांक 2 जानेवारी 2026 दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत नगरपरिषद वर मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला नुकतीच नगरपरिषद निवडणूक पार पडली असून विविध प्रश्नांसाठी वरणगावातील सिद्धेश्वर नगर मधील महिलांनी एकत्रित येत नगरपरिषदवर धडक मोर्चा काढला यावेळी तीव्र घोषणाबाजी देण्यात आली नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या केबिनमध्ये जात घेराव घालण्यात आला