औसा: शिंदळा पाटी येथे बसच्या धडकेत दोघेजण जखमी ; भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ausa, Latur | Mar 16, 2024 एका बसचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोटारसायकलीस धडक दिली. यात दुचाकीवरील मुलगा व आई हे दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शिंदाळा पाटीजवळ घडली. याप्रकरणी भादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, औसा तालुक्यातील माळुंब्रा येथील नामदेव क्षीरसागर व त्यांची आई हे दोघे दुचाकी वरून निघाले होते. ते शिंदाळा पाटीजवळील वळणावर आले असता बसचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व भरधाव वेगात चालवून मोटारसायकलला धडक दिली.