रामटेक: बनपुरी येथे गाईची शिकार ; नगरधन - दुधाळा रिठी शिवारात भीतीचे वातावरण
Ramtek, Nagpur | Dec 26, 2025 शुक्रवार दि 26 डिसेंबरला सकाळी 8 वाजता नगरधन जवळील दुधाळा रीठी शिवारात मंगेश इखार याचे शेतात वाघ दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यात दहशतीचे वातावरण आहे . मागील दोन दिवसात वाघाच्या सततच्या हालचालींमुळे परिसरात भीती पसरली आहे.25 डिसेंबरला पहाटे बनपुरी येथील धनराज मेंगरे यांच्या गाईची वाघाने शिकार केल्याची घटना समोर आली. तर दुपारी तीन वाजेनंतर रामटेक मौदा रोडवरील मोठ्या पेंच डाव्या कालव्याजवळ वाघाचे दर्शन झाल्याने वाघाचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे.