वाशिम: वंचितचे जिल्हाध्यक्ष दत्तराव गोटे यांनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत भाजपमध्ये घेतला प्रवेश
Washim, Washim | Nov 28, 2025 नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेले दत्तराव गोटे यांनी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच उडाली आहे. नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांना देण्यात येणाऱ्या एबी फॉर्म संदर्भात पक्षातील वरिष्ठावर नाराज झालेल्या दतराव गोटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.