नप रामटेकच्या निवडणुकीत रविवार दि. 21 डिसेंबरला मतमोजणीनंतर शिवसेनेचे बीकेंद्र महाजन यांचा 579 मतांनी विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यांनी काँग्रेसचे रमेश कारामोरे यांचा पराभव केला तर भाजपाच्या ज्योतीताई कोल्लेपरा यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. बीकेंद्र महाजन यांना 5201 मते मिळाली. काँग्रेसचे रमेश कारामोरे यांना 4,722 तर भाजपाच्या ज्योतीताई कोल्लेपरा यांना 3189 मते प्राप्त झाली. तर अपक्ष दामोदर धोपटे यांना 153 व अपक्ष आकाश ढोबळे यांना 110 मते मिळाली.