राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय भव्य खुली खंजेरी भजन स्पर्धा शनिवार दि. ३ व ४ जानेवारी रोजी शहरातील एडेड हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेला विदर्भातील विविध भागांतून भजनी मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शिवसेना जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले