समुद्रपूर: आमदार कुणावार यांच्या प्रयत्नातून मोहगांव,तावी, वानरचुवा येथे १ करोड ५ लक्ष रुपये किमतीच्या विकास कामांचे भुमिपुजन
समुद्रपूर:आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या प्रयत्नाने मोहगांव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मोहगांव फरीदपुर रस्याचे जिल्हा वार्षिक योजनेतून दुरुस्तीकरण १५ लक्ष रुपये,माडा योजनेअंतर्गत तावी झमकोली रस्ता १५ लक्ष रुपये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ७५ लक्ष रस्त्यांचे वानरचुवा मंगरूळ रस्त्याचे डांबरीकरण असे एकूण १ करोड ५ लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भुमिका पार पडले.यावेळी सरपंच विलास नवघरे, गिरडचे सरपंच राजुभाऊ नौकरकर,अरुणभाऊ मोटघरे,बहादूरसिंग अकाली आदी उपस्थित होते.