पनवेल पंचायत समिती शिक्षण विभाग व लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल यांच्यावतीने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अतिशय उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पनांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांच्यातील उत्सुकता आणि त्यांच्या मनातील विविध कल्पनांना एक व्यासपीठ मिळावे या हेतूने घेतल्या जाणाऱ्या विज्ञान प्रदर्शनास दिडशेहून अधिक शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल 217 प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले.