अहेरी: अखेर.. मुडेवाही गाव दारूमुक्त मुक्तिपथच्या प्रयत्नाला यश, ग्रामस्थानी घेतला पुढाकार
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील रेगुलवाही ग्रामपंचायत अंतर्गत असलेले गुडेवाही हे दुर्गम आदिवासी गावाचा दारूमुक्त झाले आहे.गावाच्या सभोवता डोंगर आणि घनदाट जंगल असून अहेरीवरून वेंकटापुर मार्गे सिरोंचा तालुक्यातील परसेवाडा पहाडीवरून या गावात जावे लागते. गावात बससेवा नसल्याने दळणवळणाची अडचण आहे.या गावात प्रामुख्याने माळी आदिवासी समाजाचे लोक वास्तव करतात आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.