बार्शी: आगळगाव येथील चांदणी नदीच्या पुलावरून वाहून जाणाऱ्या एकास चौघांनी वाचवले
Barshi, Solapur | Sep 18, 2025 बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील चांदणी नदीला पूर आला आहे. आज दि 18 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता येथील पुलावर दुचाकी सह वाहून जाणाऱ्या एकाला स्थानिक तरुणांनी वाचवले आहे. पुलावरून पाणी वाहत असताना धोकादायक प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.