राहुरी: राहुरीत नायलॉन मांजा विकणाऱ्यावर कारवाई; 7 हजारांचा मुद्देमाल जप्त
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील कानिफनाथ चौक परिसरात शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या इसमावर राहुरी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कानिफनाथ चौक येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत सचिन शांताराम क्षीरसागर (वय 43, रा. कानिफनाथ चौक, राहुरी) हा इसम अनाधिकृतरित्या नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आला.