समुद्रपूर: गिरड येथे महिलांच्या आत्मविश्वासाचे बीज उपक्रमाअंतर्गत पार पडली सोयबीन शेतीशाळा
समुद्रपुर: महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक प्रेरणादायी अध्याय गिरड येथे लिहिला गेला आहे.जिथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा 2) अंतर्गत सोयबीन शेती शाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाने महिलांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती व कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक ज्ञान देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे मोठे कार्य केले.या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. भोयर मॅडम, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. तोरणे यांनी सहकार्य केले.