ग्रामीण भागात असलेल्या वेलतुर येथे जगतगुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने 7 जानेवारी बुधवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवर पदाधिकारी, गावातील नागरिक,सेवाकेंद्राचे पदाधिकारी आदि उपस्थित होते. यावेळी रक्तदान करण्यासाठी खेड्यापाड्यातील नागरिक आले .रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सेवाकेंद्रानी प्रयत्न केले.