शिरूर: अज्ञात दुचाकीच्या धडकेत आलेगावात शेतकरी जखमी
Shirur, Pune | Jan 10, 2026 आलेगाव पागा (ता. शिरूर) येथे अज्ञात भरधाव दुचाकीने पायी चालणाऱ्या शेतकऱ्याला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेतकऱ्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे.याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.