कांदिवलीत आमदार भातखळकर यांच्याहस्ते प्रशिक्षण केंद्रातील दीडशे महीलांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वितरीत
कांदीवली पूर्व मतदार संघात आज शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेल्या शिवणकला प्रशिक्षण केंद्रातील दीडशे महीलांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली. सांगायला अत्यंत आनंद होतोय की, त्यातल्या काही महीलांनी या क्षेत्रात व्यवसायही सुरू केला आहे. ‘टॅली’चे प्रशिक्षण देण्यासाठी संगणक प्रशिक्षण केंद्रामार्फत नवा कोर्स सुरू केलेला आहे. त्याचाही आज शुभारंभ झाला.