यवतमाळ वणी महामार्गावरील करंजी टोल टॅक्स प्लाझासमोर सुमारे एक किलोमीटर अंतरावर कोठोडा गावा जवळ झालेल्या भीषण अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यवतमाळहून वणीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला एका भरधाव ट्रकने धडक दिल्याचे सांगण्यात येते.