भुसावळ शहरातील अमृत योजना अंतर्गत पाणी टाकीचे काम गेले तीन महिन्यांपासून अचानकपणे थांबवण्यात आल्याने नवनिर्वाचित भाजपा नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महत्त्वाच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम कोणतेही स्पष्ट कारण न देता बंद ठेवण्यात आल्यामागे नेमका काय हेतू आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.