सुनेत्रा पवारांनी सावधपणे पावले टाकावीत; गिधाडांपासून सतर्क राहण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा सल्ला. आज दिनांक 31 शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड होणे हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असला, तरी त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत असल्याने हा नक्कीच स्वागतार्ह निर्णय असल्याचे मत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. मात्र, या पदावर काम करताना त्यांनी अतिशय सावधपणे पावले टाकावीत, असा सल्लाही ज