नगराध्यक्ष पदासाठी 43 अर्ज आलेले वैध तर 04 अर्ज बाद ठरले आहेत, निवडणूक विभागाची माहिती
Beed, Beed | Nov 18, 2025 बीड नगर परिषद निवडणुकीसाठी काल दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची आज छाननी करण्यात आली. नगराध्यक्षपदासाठी यंदा अनुसुचित जाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षण लागू असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. एकूण ४७ इच्छुक उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी - आपला अर्ज दाखल केला होता. आज आलेल्या छाननी प्रक्रियेत - यापैकी ०४ अर्जात त्रुटी आढळल्याने - ते बाद करण्यात आले असून ४३ - अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठीची लढत आणखी रोचक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.