आमदार राजू पारवे जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. काही तातडीच्या समस्या स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तत्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, तर अनेक नागरिकांची निवेदनं स्विकारून त्या बाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.