इंदापूर: लासुर्णेत सुनेत्रा पवारांचा धनगर बांधवांकडून घोंगडी देऊन सन्मान
Indapur, Pune | Apr 23, 2024 उपमुख्यमंत्रिपद अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मंगळवारी 23 एप्रिल रोजी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत.दरम्यान इंदापूर तालुक्यातील लासुर्णे मध्ये धनगर बांधवांनी सुनेत्रा पवार यांचा घोंगडी देऊन सत्कार करीत उत्तम जानकर यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. सोमवारी उत्तम जानकर हे इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी अजित पवार यांना पाडण्याचा इशारा दिला होता.