भंडारा: रुग्णालय पेटवून देऊ... वैद्यकीय अधीक्षकांस १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी ; लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार
ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १.२० वाजता काही व्यक्ती रुग्णालयात येऊन अधिकारी कार्यरत असताना त्यांनी वाद घालत शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. रुग्णालय पेटवून देण्याचा इशाराही दिल्याचा गंभीर आरोप तक्रारकर्त्या वैद्यकीय अधीक्षकांनी केला आहे.