ग्रामीण भागात असलेल्या खोकरला येथे घराला आग लागून अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान नुकसान झाल्याची घटना 3 जानेवारी शनिवारला पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली. याबाबत चे वृत्त असे की खोकरला येथील रहिवासी बाळकृष्ण बोरीकर हे स्वतःचे घरी कुटुंबा सह झोपेत असतांना अचानक घरला आग लागून 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीची तक्रार महसूल विभाग ,व पोलीस पाटील यांना देण्यात आली.