आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन आ. सुरेश धस यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर होत असलेल्या योजनाबद्ध बदनामीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली. या प्रतिनिधी मंडळाकडून संयुक्त निवेदन सादर करण्यात आले असून पोलिस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी मोठ्या संख्येने आमदार सुरेश धस यांचे समर्थक पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते.