चंद्रपूर: सावरगाव परिसरात बिबट्याची दहशत
सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील इंदिरा नगर परिसरात मागील दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या वावरामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी हा बिबट वारंवार गावात प्रवेश करत असून, अनेकांच्या कोंबड्यांवर त्याने ताव मारल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास बिबट्याने थेट डोमाजी रामटेके यांच्या घरासमोरील अंगणात प्रवेश केला. अचानक समोर बिबट दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली.