जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही बालविवाहाची कुप्रथा अधून मधून डोकं वर काढत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मात्र जिल्हा प्रशासन आणि बालविकास अधिकारी कार्यालयाच्या सतर्कतेमुळे या अनिष्ठ प्रथेला मोठा अटकाव करण्यामध्ये यश आले आहे. गेल्या वर्षभरामध्ये यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 40 बालविवाह रोखण्यात आले असून यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाह वर प्रशासनाने विशेष करडी नजर ठेवली होती.