पुसद येथील न्याय मंदिराच्या परिसरातील साई झेरॉक्स दुकानाच्या समोर रस्त्यावर रात्रीच्या वेळी हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करू पाहणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.शाबीर असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून अंदाजे तीन हजार रुपये किमतीची 66.5 सेंटीमीटर लांबीची तलवार जप्त केली.