नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात बिबट्याची अमानुषरीत्या शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेताच्या कुंपणात वीज प्रवाहित करून बिबट्याला ठार मारण्यात आले असून, कातड्याची तस्करी करणाऱ्या आरोपींना सेलू येथे अटक केल्यानंतर या प्रकरणातील आरोपींनी वन विभागाच्या चौकशीत कबुली दिल्याची माहिती ता. १२ डिसेंबर शुक्रवारी सकाळी ९ वाजता खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.