कोंढवा परिसरातील मिठानगर भागात एका बंद घरात चोरीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक तौफिक सय्यद हे कुटुंबासह शहराबाहेर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्याने घराचे कुलूप तोडून चोरी केली. ही घटना घराच्या CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.