जांभळी खांबा येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकासाठी मोठ्या प्रमाणात परेची लागवड केली आहे परंतु 24 तासावरून आठ तास वीजपुरवठा केल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी धान पीक कसे घ्यावे असा प्रश्न पडला आहे त्यामुळे जांभळी खांबा येथील शेतकऱ्यांनी मंगळवार दिनांक 16 डिसेंबरला दुपारी तीन वाजता महाराष्ट्र राज्य वीस वितरण कंपनीच्या साकोली येथील कार्यकारी अभियंताना निवेदन देऊन 24 तास वीजपुरवठा करावा अशी मागणी केली आहे. मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते