राहुरी: नगर–मनमाड महामार्गावर राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात भीषण अपघात,आयशर टेम्पो क्रेटावर पलटी—एक ठार, दोघे गंभीर जखमी
नगर–मनमाड राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज मंगळवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे राहुरी विद्यापीठ परिसरात भीषण अपघात घडला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे सिमेंट ब्लॉकने भरलेला आयशर टेम्पो क्रेटा कारवर पलटी झाला. या दुर्घटनेत क्रेटा कारमधील एकजण जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.