मनात आलेल्या नैराश्येपोटी एकाच दिवशी चौघांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या चौघांना दिनांक 28 डिसेंबर रोजी रविवारला दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ग्राम मुर्री येथील 22 वर्षे तरुण तसेच तिरोडा तालुक्यातील ग्राम ठाणेगाव येथील 17 वर्षीय मुलाचा तसेच ग्राम कालीमाटी येथील 32 वर्षीय तरुणांचा समावेश असून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पुढील तपास गोंदिया पोलीस करीत आहेत.