देवळाली प्रवरा नगरपरिषदेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून नगराध्यक्षपदी सत्यजित कदम यांची निवड झाली आहे. पदभार स्वीकारण्याआधीच सोमवारी सकाळी कदम वस्ती परिसरात बिबट्या आढळल्याची घटना घडली.कदम वस्ती येथील शेतकरी सोपान गंगाधर पठारे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना मादी बिबट्या अचानक दिसून आली. यावेळी ऊसतोडणी काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने झडप टाकण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांना दिली.