तालुक्यातील हिंगणी येथे सुरू असलेल्या संगीत श्रीमद् भागवत सप्ताहाची समाप्ती गुरुवार, दि. १ जानेवारी रोजी भक्तीमय वातावरणात झाली. सकाळी पार पडलेल्या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण हिंगणी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली. सायंकाळी ५.३० वाजता महाकल्याने या उत्सवाची सांगता झाली.