कल्याणीनगर येथे 19 मे 2024 रोजी झालेल्या भीषण पोर्शे अपघातप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून येरवडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. या अपघातात भरधाव पोर्शेने दोन तरुणांचा जीव घेतला होता. चौकशीत अपघाताची माहिती वेळेत कंट्रोल रूम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना न कळवल्याचे आढळल्याने ही कठोर कारवाई