कर्जत जामखेडचे आमदार हे सोमवारी दि.22 एप्रिल रोजी इंदापूर तालुक्याच्या दौ-यावर आहेत. रोहीत पवारांच्या हस्ते इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन ही पार पडलयं.दरम्यान सकाळी ११ च्या सुमारास गुड माँर्निंक क्रिक्रेट क्लब च्या सदस्यांच्या विनंतीला मान देऊन रोहित पवारांनी नगरपरिषदेच्या मैदानात क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. नेहमी राजकीय मैदानात फटकेबाजी करणारे रोहित पवार इंदापूरात क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करताना पहायला मिळाले.