शहरात मसरत नगर येथील हवाला रॅकेटवर पोलिसांची कारवाई, 17 लाख रुपयाची रोकड पोलिसांनी जप्त केली
Beed, Beed | Nov 19, 2025 बीड शहरातील अवैध हवाला व्यवहारावर डीवायएसपी पूजा पवार यांनी केलेल्या अचानक छाप्यातून मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना करण्यात आलेल्या या कारवाईमुळे प्रशासनात तसेच नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.मसरत नगर भागातील एका अपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर संध्याकाळी डीवायएसपी पवार यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत १७लाखांची रोकड, पैसे मोजण्याचे मशीन आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. एकास ताब्यात घेतले.