पारोळा: दुसऱ्या दिवशीही एकही नाम निर्देशन पत्र दाखल नाही
Parola, Jalgaon | Nov 11, 2025 नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज दिनांक 11 नोव्हेंबर दुसऱ्या दिवशी देखील एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर उल्हास देवरे यांनी सांगितले. पारोळा नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवारांची पडताळणी सुरू असल्याकारणाने अद्याप पावतो काही उमेदवार पक्षाकडून निश्चित झाले नसल्यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल होण्यास उशीर होत आहे मात्र शेवटी उमेदवारांची नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी एकच तारांबळ उडणार.