बाभूळगाव: मुस्ताबाद येथे घरगुती गॅस लिकेजने भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली
मुस्ताबाद येथील किसन राऊत यांच्या घरामध्ये स्वयंपाक करत असताना गॅस पाईप मध्ये होणाऱ्या लिकेजमुळे आगीचा भडका उडाल्याची घटना एक डिसेंबरला घडली. अचानक लागलेल्या आगिने रौद्ररूप धारण केले.त्यामुळे आगीमध्ये संपूर्ण घरातील साहित्य जळून सुमारे चार लाखाचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.