वांद्रे पश्चिम येथे उभ्या राहणाऱ्या "बॉलीवूड थिम" चे भूमीपूजन
वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन २ बी च्या खाली ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान बॉलीवूड थिम साकारण्यात येणार असून आज सोमवार दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. मेट्रोलाईन 2बी च्या एकुण ७ स्टेशन व त्यामधील सुमारे 350 खांब व त्यामधील जागे मध्ये एमएमआरडीए मार्फत भारतीय चित्रपट सृष्टीचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. आज या प्रकल्पाचे वांद्रे येथे स्थानिक आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.