पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना आरोग्य उपचार, समुपदेशन, कौशल्यविकास, थेरपी तसेच पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक कार्यक्रम राबविण्यासाठी महापालिकेच्यावतीने दिव्यांग व मतिमंद यांच्यासाठी फिजीओथेरपी व मल्टिी डिसीप्लनरी थेरपी पुनर्वसन केंद्र अर्थात दिव्यांग वेलनेस सेंटर उभारले जाणार आहे. या दिव्यांग वेलनेस सेंटरच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसन होऊन त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत होणार असल्याचे आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले आहे. सध्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात अंदाजे १८६८ दिव्यांग नागरिकांची नोंद असून त्यांना वैद्यकीय सेवा, विविध उपचार पद्धती आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना सहज, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आहे.