परळी: वडगाव दादाहरी येथे सिग्नल जवळ शिर्डी एक्सप्रेस लुटीचा मोठा प्रयत्न फसला
Parli, Beed | Oct 21, 2024 काकीनाडा-नागरसोल शिर्डी एक्सप्रेस मध्यरात्री परळी जवळच असलेल्या वडगाव दादाहरी येथे सिग्नल मध्ये तांत्रिक बिघाड करून लुटण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे असफळ ठरला असून यामध्ये एका कोच मधील दोन महिलांचे दागिने चोरट्यानी लुटले असल्याची माहिती मिळत असून याबाबत अद्याप रेल्वे पोलिसात अधिकृत गुन्हा दाखल झालेला नाही.