जळगाव: साधनाताई महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा GM फाऊंडेशन येथे जल्लोष; भाजप कार्यकर्त्यांचा गुलाल-फटाक्यांनी कोर्ट चौक दणाणले
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधनाताई महाजन या जामनेर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने जळगाव शहरातील कोर्ट चौकातील जी.एम. फाऊंडेशन कार्यालयाजवळ भाजप कार्यकर्त्यांनी गुरूवारी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुलाल उधळत, फटाके फोडून ढोल ताश्यांच्या गजरात प्रचंड जल्लोष केला.