आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली आष्टी येथे पाणीटंचाई निवारणार्थ आढावा बैठक आज दुपारी घेण्यात आली यावेळी आष्टी पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीची गाव निहाय पाणीटंचाई स्थितीबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली त्या माध्यमातून पाणीपुरवठा व सार्वजनिक दुरुस्ती खोलीकरण नवीन विंधन विहिरी विहीर अधिग्रह तसेच दुरुस्ती संदर्भात जानेवारी 2026 ते मे 2026 दरम्यान आवश्यक कामाचा आराखडा तयार करण्यात आला